बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला वापरलेल्या अर्वाच्य भाषेचा सर्वच स्थरावारू निषेध.
अमळनेर : विक्की जाधव.
हें प्रकरण तुम्ही पत्रकारांनी जास्त पेटवले आहे. तर जसं काही तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा बातम्या देतेयं अश्या अरवाच्च भाषेत पत्रकारां सोबत बोलणाऱ्या वानम म्हात्रे चीं जीभ सरकली
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला वापरलेल्या अर्वाच्य भाषेचा आणि असंवेदनशील वक्तव्याचा निषेध केला जात आहे. बदलापूर येथील एका नामांकित शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकार महिलेला वामन म्हात्रे यांनी तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशी अशोभनीय भाषा वापरलयाचे पाहायला मिळाले.
बदलापूर येथील शालेय अल्पवयीन मुलींवर शाळेतीलत सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. काल दिवसभर सुरू असलेल्या बदलापूरातील आंदोलनाचं वार्तांकन करत असताना वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरून संवाद साधल्याचा आरोप महिला पत्रकार मोहिनी जाधव यांनी केला आहे. बदलापुरातील ज्या शाळेत घटना घडली त्या ठिकाणी पत्रकार असणाऱ्या मोहिनी जाधव वार्ताकंन साठी जात होत्या. त्याच रस्त्यात त्यांना वामन म्हात्रे भेटले. बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष असलेले वामन म्हात्रे मोहिनी जाधव यांना पाहून थांबले आणि हे प्रकरण तुम्ही पत्रकारांनी पेटवले असल्याचे बोलू लागले. यावेळी त्यांनी मोहिनी जाधव यांना जसं काही तुझ्यावरच बलात्कार झालाय, अशा बातम्या देत आहेस अशी भाषा वापरली. त्यानंतर त्यांना त्यांचे शब्द खटकले आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलिसांनी देखील या संदर्भातील तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, वामन म्हात्रे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे, इतकंच काय तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या महिला पत्रकाराचे समर्थन केले असुन कार्यवाही व्हावी अशी तग धरली आहे.