..मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय, शैक्षणिक संस्थासाठी दिले ‘हे’ आदेश.
बारामती(प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)
बदलापुरातील अल्पवयीन अत्याचार प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्थासाठी मुंबईचे मंत्री मंगलप्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार यापुढे शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत सर्वांना पोलीस पडताळणी बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या स्वच्छतागृहात एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमणं बंधनकारक असणार आहे.
शैक्षणिक संस्थेत सीसीटीव्ही लावणं बंधनकारक असणार आहे. मुलींच्या आत्मसंरक्षणासाठी शाळांमध्ये अभियान सुरू करण्याचे आदेश, महिला पालकांची समिती नेमून प्रत्येक महिन्याला सुरक्षा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.