इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर
इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे.
महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक दिन साजरा
आज दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष मा .हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ, एन. एस एस व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंग प्रतिबंधक दिनानिमित्ताने कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा कोकणे एस.डी.पोलीस निरीक्षक (इंदापूर पोलिस स्टेशन ), श्री सातव ए .पीय व सौ लडकत मॅडम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सरवदे, उपप्राचार्य गोळे डी. के ,डॉ शिवाजी वीर ,डॉ भिमाजी भोर , डॉ. भरत भुजबळ प्रा . माने प्रमुख मान्यवर व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितउपस्थित होते . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शिवाजी वीर यांनी केले . सौ .लडकत मॅडम यांनी मुलांना रँगिग विषयक कायदेशीर माहिती दिली . या कार्यकमात बोलताना पोलिस निरीक्षक मा कोकणे म्हणाले की विदयार्थानी महाविदयालयीन जीवानात शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी घेऊन करिअर घडवावे .तसेच युवक व युवतीनी आई ,वडिल व गुरुजांना वर प्रेम करावे . महाविद्यालयात संस्कारक्षम विद्यार्थ्यां असतील तर असे दिन साजरे व कायदे करण्याची गरज निर्माण होणार नाही . या वेळी प्राचार्य डॉ जीवन सरवदे म्हणाले की विद्यार्थ्यानी सैराट होण्यापेक्षा विराट होण्यासाठी महाविद्यालयांतील साधनांचा उपयोग करून घ्यावा. यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना रँगिग प्रतिबंधक विषयावरील लघु चित्रपट देखील दाखविण्यात आला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे यांनी केले होते. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय
सेवायोजना प्रमुख प्रा माने उत्तम
यांनी केले .