अमळनेर ची जनता सुज्ञ आहे लोकप्रतिनिधी त्यांना मूर्ख बनवू शकणार नाहीत. प्रा. अशोक पवार.
अमळनेर शहरात लागलेल्या बॅनर वरून पवारांकडून पवार उतरले मैदानात…
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसं तसे अमळनेर विधानसभा मतदारसंघात नवनवीन ट्वीस्ट बघण्यास मिळत आहे. मागील काही दिवसापासून अमळनेर शहरात मंत्री अनिल पाटील यांच्याकडून खा. सुप्रिया सुळे ह्या अमळनेर दौऱ्यावर आले असता अशा आशयाचे बॅनर झडकले असून प्राध्यापक अशोक पवार यांनी त्यासंदर्भात अमळनेर ची जनता सुज्ञ आहे तुम्ही लोकप्रतिनिधी त्यांना मूर्ख बनवू शकणार नाहीत अशा भाषेत चांगलीच खबर घेतली.
शहरातील मुख्य रस्त्यावर बॅनर मध्ये असा आहे मजकूर..
निम्न तापी पाडळसे धरणाला ४८९० कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता कोणामुळे मिळाली यावर प्रा. पवार यांचे उत्तर असे कीं सुज्ञ जनता पाडळसे धरणाची किंमत बदलली की सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. आतापर्यंत ही तिसरी प्रशासकीय मान्यता आहे. असे ही सत्ता धार्यांना समजूनये हें दुर्दैव आहे.
तर 26 वर्षात धरण पूर्ण न झाल्याने 142 कोटी किमतीचे धरण 4890 कोटी ला गेले याची थोडीफार तरी लाज येथील लोकप्रतिनिधीनां वाटत नाही? धरणाच्या वाढीव किमतीला मंजुरी घेणे हा काही तुमचा पराक्रम नाही.अजून धरणाची किंमत बदलेल आणि पुढे पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल. तर केंद्रीय जल आयोगाची Investment Clearan चा मार्ग कोणामुळे मोकळा झाला. असे म्हणणारे तुम्ही अमळनेर चीं सुज्ञ जनता सुज्ञ आहे आणि तुम्हाला तुमची जागा निश्चितचं दाखवेल यात शंका नाही. केंद्रीय जल आयोगाची ही दुसऱ्यांदा मान्यता आहे .हे काम तापी महामंडळाचे व जलसंपदा सचीवांचे हे प्रशासकीय काम आहे. या कार्यालयीन तांत्रिक बाबी आहेत. हा मिरवण्याचा मंत्रीमहोदय भांडवल करण्याचां कार्यक्रम नाही.तर केंद्रीय वन विभागाची मंजुरी कोणामुळे मिळाली
म्हणजे तुम्ही अमळनेर च्यां जनतेवर उपकार केलेत का ?? तुमचे काही कर्तव्य नाही का ? सुज्ञ जनता केंद्रीय वन विभागाची मंजुरी घ्यायला पाच वर्षे लागतात का अशा वल्गणा मतदार संघातील लोक करू लागले आहेत ही शरमेची गोष्ट आहे. हे प्रशासकीय काम आहे आपली स्वतःची पाट थोपटून घेण्याची आवश्यकता काय. पाडळसे धरणा च्या आड येणाऱ्या अडचणी कोणामुळे सुटल्या.असे जर तुम्ही म्हणत असाल तर अडचणी प्रशासनामुळे तात्पुरत्या सुटल्या, पण पुन्हा या अडचणी निर्माण होणारचं आहेत. पाडळसे धरणाला राज्य सरकारकडून सगळ्यात जास्त 508 कोटीचा निधी कोणी आणला हें सांगणाऱ्यानो जनता सुज्ञ आहे. जनतेला हें ही सांगा पाडळसे धरण राज्य सरकारच्या निधीतून कधीही होणार नाही .तज्ञ अधिकाऱ्यांच्या मते दरवर्षी 500 कोटी धरणासाठी मिळाले तरच धरण दहा ,पंधरा वर्षात पूर्ण होऊ शकते. दरवर्षी पाचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम केंद्र सरकारच देऊ शकते. पाच वर्षात 500 कोटी मिळाले तर धरण अजून पंचवीस वर्षे होणार नाही. जनता सुज्ञ आहे. हें तुमचे अपयश आहे कीं
पाडळसे धरण पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी तुम्ही अपयशी ठरले आहेत हें ही सुज्ञ जाणून आहे.
जनहितार्थ
प्रा. अशोक पवार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, गट अमळनेर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.