June 29, 2025 7:58 am

किल्ला विभाग येथील विविध समस्यांचे आमदार शिंदे यांना शिवसेनेच्या प्रियांका गायकवाड यांच्याकडून निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी – भुईकोट किल्ला जतन व दुरूस्ती कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे आले असता करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी किल्ला विभाग येथील विविध समस्यांचे निवेदन आमदार शिंदे यांना दिले. सदर निवेदनामध्ये त्यांनी किल्ला विभाग येथील विविध समस्यांचा सविस्तरपणे उल्लेख केला असून आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, करमाळा शहरामधील विविध वॉर्डामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत महिला व पुरूषांसाठी नव्याने अद्यावत शौचालये उभी करण्यात आलेली आहे परंतु किल्ल्यामध्ये एकही अद्यावत शौचालय नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे जीर्ण बांधकाम झालेल्या व पाण्याच्या अभावी शौचालयांची दयनीय अवस्था झालेली असून नवीन अद्यावत शौचालयाची निर्मिती करावी. तसेच किल्ला विभागातील अंतर्गत रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत व नगरपरिषदेने बोळीमध्ये बसवलेल्या पेव्हींग ब्लॉक निकामी झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे किल्ला विभागातील अंतर्गत रस्त्यांवर बसविलेले पेव्हींग ब्लॉक काढून सर्व रस्ते नव्याने काँक्रीटीकरण करून उत्कृष्ट कामासह करावेत.
त्याचप्रमाणे किल्ला विभागातील अंतर्गत गटारी कित्येक वर्षापासून दुरूस्त न झाल्याने नागरिकांच्या घरामध्ये गटारीचे पाणी येत आहे तसेच छोटा पाऊस झाला तरी गटारींवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असल्याने गटारींचे नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे. तसेच किल्ला विभाग येथे लोकमान्य टिळक यांचा पुतळा असून सदर पुतळयाकरिता लाखोंचा निधी खर्च झालेला आहे. परंतु खर्च झालेल्या निधी प्रमाणे काम न झाल्याने कोणत्याही प्रकारचे सुशोभिकरण या ठिकाणी झालेले नसल्याने लोकमान्य टिळक यांचा पुतळा परिसर सुशोभिकरण करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी गायकवाड यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना दिले असून लवकरच किल्ला विभाग येथील विविध गटारींचे कामास सुरूवात करू असे आश्‍वासन यावेळी आमदार शिंदे यांनी गायकवाड यांना दिले. शेवटी गायकवाड यांनी आमदार शिंदे यांना ऐतिहासिक कारंजा विहीरीची दुरावस्था पाहण्याची विनंती केली असता आमदार शिंदे यांनी तात्काळ विहीरीची पाहणी करून विहीरीच्या दुरावस्थेबाबत खेद व्य्क्त करीत त्याबाबत योग्य नियोजन करण्याचे ही ठोस आश्वासन दिले असून उर्वरीत कामांसाठी नगरपरिषदेस निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावण्याचे ही आमदार शिंदे यांनी सांगितले.
यावेळी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, किरण ढेरे, रामकृष्ण माने, विवेक येवले, ॲङ राहुल सावंत, भरत आवताडे, तानाजी झोळ, फारूक जमादार, अशपाक जमादार, बापू तांबे, चंद्रकांत चुंबळकर, विशाल गायकवाड, प्रविण शहाणे, प्रफुल्ल शिंदे, दिग्विजय घोलप, संजय भालेराव आदीजण उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!