June 29, 2025 10:57 pm

बांगलादेशात हिंदुवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ तहसीलदार यांना दिले निवेदन तर कडेकोट बंद ला व्यापार्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

बांगलादेशात हिंदुवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ तहसीलदार यांना दिले निवेदन तर कडेकोट बंद ला व्यापार्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद. 

 

अमळनेर: विक्की जाधव. 

शहरात शुक्रवारी सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ स्वयंस्फूतीने बंद पाळून निषेध व्यक्त केला.बांगलादेशात धार्मिकतेच्या आधारावर तेथील हिंदुवर भयंकर हत्याचार सुरू आहेत. श्रद्धास्थानाची तोडफोड देव ,देवतांची विटंबना केली जात आहे. या हिंसाचारात अल्पसंख्यांक हिंदू महिलांवर बेधडकपणे बलात्कार त्यांच्या कपड्यांचे अत्यंत विकृत प्रदर्शन करीत असल्याचे दिसत आहे.

माणुसकीला वाचविण्यासाठी भारत सरकारने या हिंसाचाराचा गांभीर्याने विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे. त्यात भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षितेसाठी ताबडतोब पावले उचलावीत वेळ पडल्यास आवश्यक ती कारवाई करावी. बांगलादेशातील भयावह व असुरक्षित वातावरणामुळे जीव वाचवण्यासाठी सीमेवर जमा झालेल्या अल्पसंख्यांक हिंदू समाजासाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्यात.गेल्या काही दिवसातील भारतात घडणाऱ्या काही घटना पाहिल्यास असे निदर्शनात येते की, जिहाधीशा येथे सुद्धा असाच हैदोस माजवण्याच्या प्रयत्नात आहे. अरविंद वैश्य, यशश्री शिंदे ही याचीच उदाहरणे आहेत अशा घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी.

सकल हिंदू समाज बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीने किमतीत असून भारत सरकारने या मागण्यांच्या गांभीर्यपूर्वक दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.

या निवेदनावर डॉक्टर संजय शहा, सचिन चौधरी, प्रविण गुरव, राकेश शर्मा,मनोज भोई, वासुदेव निळे, चंद्रकांत पाटील, सचिन महाजन, शंतनु भावसार, गोपाल वाघ, ज्ञानेश्वर कोळी, विनोद दुसाने, कमलेश पवार, अशोक कुमार छाजेड नरेंद्र माळी प्रकाश सोनार जय पारधी संजय शेटे रतिलाल बाविस्कर भगतसिंग परदेशी, दगडू शिंगाने पंडित आभार गिरीश भाऊ विनोद शिंगाने जयेश ठाकरे नंदलाल जगताप राहुल ठाकरे अभिषेक राजपूत मयूर बिराडे रवी घोगले, राजेंद्र चौधरी मयूर ठाकूर गौरव पाटील हितेश हटकर सुनील पाटील साईराज पाटील जयराम चौधरी पप्पू महाजन निखिल जगदाळे योगेश पाटील अखिलेश पाटील मनीष पाटील सुवर्णदीप राजपूत चंद्रकांत कंखरे पप्पू लोंढे किरण पाटील संजय चौधरी गोरख अहिरे प्रकाश बोरसे सुरेश चौधरी श्रीकांत जोशी आकाश वाणी योगेश जव्हेरी आदींच्या सह्या आहेत. तर समस्त हिंदू समाज यावेळी उपस्थित होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!