रो हाऊसच्यां कंत्राशन साईट वर बांधकाम कामगारांचा मुलाचा मृत्यू..
अमळनेर : विक्की जाधव.
बांधकामावर सहा दि. १४ रोजी सकाळी घडली
शहराती डी डी नगर परिसरात असलेल्यागोहील नगर येथे अभय गोहील यांच्या मालकीच्या रो हाऊस चे बांधकाम चालू आहे. येथे सहावर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे. जगदीश डाक्टर सेनानी बडवाणी, मध्यप्रदेश हा कुटुंबासह अभय गोहील यांच्या बांधकामावर सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी मजुर म्हणून परिवारासाह राहत होता. काल दि. १४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बांधकामच्या साईट ला पाणी मारण्यासाठी सुरू असलेल्या पाणी मोटार जवळ गेल्याने त्याला विजेचा धक्का लागला आणि तो खाली कोसळला क्षणाचाही विचारन करता पालकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. मात्र बांधकाम कंत्राक्शन मालक गोहील याच्या निष्काळजीपणामुळे ऐका निष्पाप मुलाचा जीव गेला असुन मोटर अशी उघड्यावर असल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसातकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.