ते पुढील विधानसभेत दिसणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ शरद पवार.
ते बॅनर अजित दादा यांना निदर्शनास आणून देण्यासाठी..
अमळनेर : विक्की जाधव.
जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अजित दादा पवार आणि सहकारी यांचे अमळनेर मतदार संघात आज आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर शरद चंद्र पवार गटाकडून ते पुढील विधानसभेत दिसणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. आशा आशाच्या बॅनरचे अमळनेरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होताना दिसत आहे तर अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून अनेक जण इच्छुक असून पक्ष सर्व्हे करून उमेदवार देईल तसेच कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्ही जिंकणारच आहोत असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी अमळनेर येथे मागील काही दिवसात पताकारांशी बोलताना केला होते.
अमळनेरची जागा राष्ट्रवादीच लढेल आणि जिंकेलही सद्या मंत्री असलेले अनिल पाटील यांना पाडण्यासाठी सर्व कार्यकर्ते मनात सभ्रम नं ठेवता एक जुटीने काम करणार आहेत असेही तें म्हटले होतें अमळनेर शहरात आज अजित दादा पवार येत असून त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठीचं अमळनेर तालुक्याने मंत्री अनिल पाटील यांना नाकारले असून ही बॅनरबाजी आहे असे शरद पवार गट अमळनेर तालुक्याचे काही पदाधिकाऱ्यांनी मार्मिक शी बोलताना सांगितले.