June 29, 2025 9:08 pm

इंदापूरच्या तहसीलदार पदाचा कार्यभार जीवन बनसोडे यांनी घेतला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूरच्या तहसीलदार पदाचा कार्यभार जीवन बनसोडे यांनी घेतला.

पिंपरी बुद्रुक :
दिनांक- 12/08/2024 प्रतिनिधी: समाधान रजपूत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तहसीलदार पदाचा कार्यभार जीवन भिकाजी बनसोडे यांनी (दिनांक 8) गुरुवारी स्वीकारला. इंदापूर तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी तहसीलदार म्हणून जीवन बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली. जीवन बनसोडे यांनी यापूर्वी चंद्रपूर, नागपूर, मोहोळ व जत येथे तहसीलदार पदी काम केले आहे.
प्रशासनात अनेक वर्षे जीवन बनसोडे यांनी अत्यंत सक्षमपणे व शिस्तबद्धपणे आपला पदभार स्वीकारला आहे. यांनी दुपारी 4 च्या सुमारास आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. तहसीलदार केबिनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दरवाजा उंबऱ्याला खाली वाकून विनम्रपणे नमस्कार केला आणि खुर्चीवर जाऊन स्थानापन्न झाले. नवीन तहसीलदार साहेबांनी कार्यभार हातात घेताच सहकार्यांचा परिचय करून घेतला. सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालयात असणाऱ्या विविध विभागाची प्रत्यक्षपणे जाऊन पाहणी केली. गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही माहिती घेतली. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वसामान्य जनतेची कामे ही अडवणूक न करता व त्यांना सारखे हेलपाटे न मारता करून द्यावीत व सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तहसीलदार बनसोडे यांची कामाची पद्धत आणि अनुभव यांच्या जोरावर इंदापूर तालुक्यातील जनता त्यांच्या कामावर खुश होईल अशी अपेक्षा आहे. पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका यांच्याकडून जीवन बनसोडे यांचे स्वागत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!