तेजस्विनी दाभाडेचे सेट परिक्षेत यश यु.जी.सी द्वारे मान्यताप्राप्त वाणिज्य विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर पदाची MH-SET महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठअंतर्गत ७ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.या परिक्षेत समाजभूषण कु.तेजस्विनी श्रीराम दाभाडे ह्या असिस्टंट प्रोफेसर पदास पात्र झाल्या आहेत.त्या यशाबदल त्यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा युवा अध्यक्ष श्री.गणेश मढीकर यांनी प्रा.तेजस्विनीचे अभिनंदन,सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील रहिवासी आहे.तसेच ती आसाराम भांडवलदार महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
सेट परीक्षा पास या यशाबद्दल बोलतांना तिने जिद्द,चिकाटी व इच्छा शक्तीच्या जोरावर यश संपादन केल्याचे सांगितले आहे.शिवाय तेजस्विनीचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणा देणारे आहे.या सत्कार प्रसंगी श्री.होलिये सर (ज्युनिअर लक्ष्मीकांत कांत बेर्डे) श्री.नारायण जोजरवार सर, श्री.ज्ञानेश्वर राऊत,श्री.आबाराव सिरसाठ,श्री.गजानन पैठणकर,श्री.कल्याण मढीकर श्री.किरण जाधव,श्री.उद्धव व्यवहारे,श्री.जयराम सोनवणे,श्री.गणेश शिंदे,श्री.सर्जेराव शिरसाठ,श्री.रमेश शामतकर,श्री.चेतन दाभाडे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.