ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोघेही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय शत्रू असलेले आजी-माजी आमदारांनी आत्ताच कसा माजी आमदार वर झालेला गुन्हा मागे घेतला. शाम पाटील.
अमळनेर विक्की जाधव.
अमळनेर तालुक्याचे राजकारण सध्या सत्तेसाठी लाचार झाले असुन सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करू कुठेतरी दूर जाऊन सेटलमेंट करून घ्यायची. आणि आपली राजकीय पोळी भाजून जनतेस अंधारात आजी-माजी आमदार ठेवत आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी केले आरोप एकमेकांचे राजकीय दुश्मन असलेले नेत्यांना आत्ताच पुकळा आला एकत्र येण्याचां?? तुम्ही केस च्या सेटलमेंट साठी कोर्टाच्या तारखेला एकत्रित आलेत यां मागे नक्की काही करण असेल तुम्ही पाडळसरे धरणावरती एकत्र आले असते तर स्वागत केले असते.. मा.आमदार शिरीष चौधरी यांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.. त्यांनी कधीही आम्हाला त्याच्यातून निर्दोष मुक्तता करा असे सांगितले नाही हे सर्व परस्पर कसे आताच झाले हाच माझा प्रश्न आहे..
मी लोकप्रतिनिधी असुन माला हा अधिकार आहे.
तर 2014 ते 19 शिरीष चौधरी आमदार असतांना साहेबराव पाटील आणि अनिल पाटलांनी त्यांच्याविरुद्ध एखादा आंदोलन मोर्चा किंवा पत्रव्यवहार केला असेल तर त्याचे पुरावे जनतेसमोर त्यांनी आणावे..
2019 तें 2024 पाच वर्ष अनिल पाटील आमदार असतांना शिरीषदादा चौधरी यांनी एखादे आंदोलन, एखादा मोर्चा एखादा पत्रव्यवहार केला असेल तर त्याचे पुरावे जनतेसमोर आणावे. निवडणूकीं नंतर आपला बोरा-बस्तरं बांधणारे चौधरी कधीही दिसले नाहित.
2014 ते 19 आ. शिरीष चौधरी आमदार असताना त्यांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांपैकी 54 कोटी रुपयांची विकास काम अनिल भाईदास पाटलांनी केलेली आहेत असं शिरीष चौधरी यांनीच काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते..
पण अमळनेर तालुक्याचे राजकारण सध्या सत्तेसाठी लाचार झाले असुन सर्वसामान्य माणसाची दिशाभूल हें राजकीय लोक करत आहेत असे ही शाम पाटील यांनी सांगितले
2016 मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत जेवढे नगरसेवक उमेदवार होते जेवढे राजकीय कार्यकर्ते नेते आणि कार्यकर्ते होते त्याच्यात सगळ्यात जास्त केसेस माझ्यावरती झालेल्या आहेत त्या कार्यकाळामध्ये माझ्यावर तीन गुन्हे दाखल झाले त्यापैकी त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांवर एक जरी गुन्हा दाखल झाला होता का? आणि त्याच्यात माझी कौटुंबिक आणि आर्थिक हानी झाली हे तुम्हाला ज्ञात आहे.. तुम्ही सगळे त्या गोष्टीला न्याय देत मला साडेचार महिने बाहेर( तडीपार ) राहावं लागलं ..दोन महिने नाशिक कारागृहातही होतो आणि आता मंत्री अनिल पाटील आणि कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे नाव काढण्यासाठी शिरीष चौधरी आणि मंत्री अनिल पाटील सुद्धा कोर्टात उपस्थितीत राहून आणि साहेबराव पाटील दोन गुन्ह्यांमध्ये माझे दोन्ही भाऊ आहेत..
अमळनेर शहरातल्या तालुक्यातल्या राजकारणातला मी एकमेव असा राजकीय कार्यकर्ता आहे की निवडणुकीच्या कार्यकाळात माझे संपूर्ण कुटुंबाला आणि माला खोट्या गुन्हात अडकवले गेले होतें. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. असे शाम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मंडली.
येत्या ९ ऑगस्टला माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ही स्पष्ट करतील असे सध्याचे चित्र दिसत आहे.