शाश्वत विकासाच्या नावावर अमळनेर शहराला ब्ल्यू प्रिंट चे स्वप्नं दाखवणारे आमदार साहेब हाच का आपला शाश्वत विकास..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शहरात विधानसभेच्यां पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाच्या नावावर हजारो कोटी रुपयांच्या विकासकामाच्या गप्पा सुरु आहेत मात्र अमळनेर शहरासह तालुक्याचा विकास हा नावालाच असून टक्केवारीच्या कामांमुळे तालुक्यात काय काम झाले तेही निष्कृष्ट दर्जाचे असून तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
हजारो कोटी रुपये मंजूर करून शहराला ब्लू प्रिंट चे स्वप्न दाखवणारे माननीय मंत्री साहेब आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शाश्वत विकासाच्या नावावर निव्वळ तालुक्यात बॅनरबाजीचं केली. फक्त फोटोसाठीचं होता का? हा अट्टाहास..
दुर्दैव येथील लोकप्रतिनिधींचं..
मागील दोन दिवसात शहराच्या जपान जीन भागातून गेलेल्या अंतयात्रेला अक्षरशः चिखलातून आणि खड्ड्यातून वाट काढत जाण्याची वेळ आली होती. हें ही समस्त अमळनेरकरांनी बघितले असून जिवंत माणसांसाठी नव्हे परंतु मृत्युंशंय्यावर जाणाऱ्यांसाठी तरी रस्ता द्यावा. अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे. याच परिसरातील नागरिकांनी मागील वर्षभरात तीन-चार वेळा निवेदन देऊनही याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी माहीती नागरिकांनी मार्मिक सोबत बोलताना दिली. सामान्य जनतेकडून कर वसुली करतांना कुठलीही कसर न सोडणारी अमळनेर नगरपरिषद सुविधा देण्यात मागे का पडत आहे असा प्रश्न येथिल नागरिक विचारत आहेत.
हॉटेलात बसून पालिकेची अर्थात खोक्यात ok झाल्यावर.. दुर्दशा झालेल्या रस्त्याची काळजी करणार तरी कोण ?
दरम्यान काही दिवसांपुर्वीच तालुक्याच वातावरण अनिल पाटील आणि साहेबराव पाटलांच्या धुळ्यात एका हॉटेलवर झालेल्या भेटीने चांगलच तापलं होत. आमदारकीं माझी अन नगरपालिका तुझी अशी डील झाल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय परिघात होती. या नेत्यांच्या राजकारणात मात्र सामान्य जनतेला प्राथमिक सुविधांपासून वंचित रहाव लागत असल्याचे पहायलं मिळत आहे.
मागील काही दिवसात सामाजिक न्याय विभागाच्या सुमारे १५ लाखाच्या निधीतून उभारण्यात येणारे दलित वस्तीच्या गाव प्रवेशद्वाराचे स्लॅबचे काम सुरु असतानचं कोसळून मोठा अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. टक्केवारीच्या या निष्कृष्ट दर्जाचा कामाबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता. २५/१५ च्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १५ लाखाच्या निधी खर्च करुन अमळगाव येथे दलित वस्तीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरु होते.
१६ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणारा निधी हा
प्रामुख्याने गावाच्या मुलभूत गरजा आणि सुख सुविधांवर खर्च करणे अपेक्षित असतो.
परंतु निव्वळ फोटो बॅनरबाजी आणि टक्केवारी च्या चाललेल्या या अट्टाहासामुळे तालुक्याचा खरोखर विकास झालाय का?
येणाऱ्या विधानसभेत अमळनेरकर जनता मतदार म्हणून आपला विकास स्वतः करून घेतील. अशा चर्चा सद्या अमळनेर मतदार संघात सुरु आहेत.
क्रमश..