November 21, 2024 3:02 pm

करमाळा भुमी अभिलेख कार्यालयातील कारभाराची चौकशी करण्याची जिल्हा अधीक्षकांकडे मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा भुमिअभिलेख कार्यालयात शासनाचा कर्मचारी असताना खाजगी व्यक्तीकडून संगणकावर सर्व प्रकारच्या नोंदीचे काम उप अधीक्षक भूमि अभिलेख करमाळा यांच्या आशीर्वादाने चालत असून सर्वसामान्य नागरिकांची ह्यात पिळवणूक होत असून याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी लेखी तक्रार जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुख जमादार यांनी केली आहे
यावेळी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात वारस नोंदी ,बक्षीस पत्र नोंद, हक्क सोड पत्र ,नोंद मृत्युपत्र नोंद ,गहाणखत, आधी अन्य कारणांची नोंद करण्यासाठी खाजगी व्यक्तीकडून हे काम करमाळा उपअधीक्षक भूमी अभिलेख हे करत आहे वास्तविक पाहता या ठिकाणी शासनाने एका कर्मचारी ची नेमणूक केल्याचे समजते या कार्यालयात बेबंद कारभाराच्या संदर्भात अनेक आंदोलने झाली लोकांनी नोटा घेऊन आंदोलन केली अधिकाऱ्याच्या टेबलावर नोटांचे बंडल सुद्धा टाकण्यात आले व काम करा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे या विभागातील तात्काळ चौकशी करून खाजगी काम करणाऱ्या इसमाला ताबडतोब हाकलून देण्यात यावे व अधिकृत कामगाराची या ठिकाणी नेमणूक करावी तसेच करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक रुजू झाल्यापासून मुख्यालयाठिकाणी राहत नसल्याचे समजते शासनाच्या नियमानुसार त्यांनी मुख्यालयाठिकाणी राहणे बंधनकारक असताना ते मुख्यालयी राहत नसल्याचे समजते तरी याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांनी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधितावर करावी व आमदार संजय मामा शिंदे यांनी ही याबाबत लक्ष घालण्याची मागणी जमादार यांनी केली आहे. तसेच जमादार यांनी करमाळा येथील भुमी अभिलेख कार्यालयात काम करणारा खाजगी व्यक्ती फोटो प्रसिद्धी साठी दिलेला आहे.

करमाळा येथील भुमी अभिलेख कार्यालयात काम करणारा खाजगी व्यक्ती

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!