करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये दिनांक 3 ऑगस्ट शनिवार रोजी दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दोशी सर तसेच डॉक्टर सुनिता दोशी, शितल करे पाटील या होत्या तसेच शाळेच्या संचालिका सुनीता देवी व मुख्याध्यापिका मोहिते याही उपस्थित होत्या.
सध्या होणाऱ्या ऑनलाईन व्यवहारांमुळे आधुनिक नाणी पाहणे हे सुद्धा दुर्मिळ होत चाललेले आहे. जुन्या काळामध्ये व्यवहारासाठी कोणती नाणी वापरली जात होती तसेच नाणी सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारचे अस्तित्वात होती हे मुलांना दाखवण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते .यामध्ये 1882 ते आधुनिक नाण्यांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये सम्राट अशोककालीन नाणी, चायनीज नानी, मध्ययुगीन नाणी, सौदी अरेबिया येथे वापरली जाणारी नाणी ,नेपाळ तसेच मॉडर्न इजिप्त मध्ये वापरली जाणारी नाणी, इंडियन नाणी, कवड्या, आने ,पैसा, विविध देशातील स्टॅम्प्स , तसेच काही अँटिक पीस यांचाही समावेश होता. अशा दुर्मिळ वस्तू पाहायला भेटणे हा सुद्धा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. मुले ही नाणी पाहताना खूप उत्सुक दिसत होती तसेच ते बघून खूप खुश ही होत होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालक वर्ग ही उपस्थित होता हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कष्ट घेतले.