June 29, 2025 7:44 am

श्री गिरधरदास देवी विद्यालयातील नक्ष माने याची चमकदार कामगिरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – करमाळा येथील श्री गिरधरदास देवी विद्यालयातील नक्ष माने याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने देवी विद्यालयाचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, सचिव अमोद संचेती, संचालिका सुनिता देवी, संचालक विजयकुमार दोशी , चंद्रकांत देवी व मुख्याध्यापक संभाजी जगताप यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जेऊर येथे गुरूवार दि.01 ऑगस्ट 2024 रोजी फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा पार पडल्या.  सदर स्पर्धेमध्ये नक्ष माने याने दैदिप्यमान कामगिरी करीत 14 वर्षे वयोगट व 62 किलो वजन गटात करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविला. त्याच्या यशामुळे श्री गिरधरदास देवी विद्यालयासह करमाळा तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरोद्वागार मुख्याध्यापक जगताप यांनी  नक्ष माने याला शुभेच्छा देतेवेळी केले. नक्ष मानेच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी क्रिडा शिक्षक जितेंद्र शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले असून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माने याचे अभिनंदन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!