स्वर्गीय किसन बाबुराव शेंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य व जेष्ठ नागरिकांकरीता बाकडे
(निलेश गायकवाड)
वाटलूज (ता दौंड) येथे स्वर्गीय किसन बाबुराव शेंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते सातवीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व जेष्ठ नागरिकांकरीता बाकडे बसवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्तीचे संचालक,माजी आमदार रमेश थोरात जिल्हा परिषद सदस्य,दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे,माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे,एस एम जोशी कॉलेज हडपसर प्राचार्य किशोर काकडे उपस्थित होते. तसेच इतर मान्यवर ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विविध उपक्रमासह ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मोरूचीचे संस्थापक अध्यक्ष अमोल महाराज सूळ यांचे फुलाची कीर्तन यावेळी झाले.कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थांनी केले.