भिगवण मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन; पूर्व परंपरेनुसार मोहरम व ताबूत बसविला
(निलेश गायकवाड)
हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतिक असलेला भिगवण गावचा गगनचुंबी ताबूत व मोहरम भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भिगवण मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे व श्री काळ भैरवनाथ च्या पंढरीतील मोहरम व ताबुत ची मिरवणूक या भिगवण गावांतून पुर्व प्रमाणे व परंपरेनुसार काढून हिंदू मुस्लिम एक आहेत,
असे संदेश देत गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम दर सालाबाद प्रमाणे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी भिगवन गावचे व सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिगवण पोलिसांनी देखील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केल्याचे नागरिकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन, इब्राहिम मुलाणी,अब्दुल मुलाणी ,रसूल मुलाणी , जावेद शेख(उप सरपंच ग्रामपंचायत भिगवण) यांनी केले.सुलतान मुलाणी,अस्लम मुलाणी ,शिरज मुलाणी,तयाब मुलाणी, हामजू मुलाणी,जमिर मुलाणी,मौला मुलाणी,हुसेन मुलाणी आदींनी केले होते.नियोजन
सलिम इब्राहिम भाई शेख,व आदि मान्यवरांनी केले.
मिरवणूकीचा मार्ग जामा मस्जिद भिगवन,ते काळ भैरवनाथ मंदिर,ते ग्रामपंचायत सर्विस रस्त्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,ते जय मल्हार चौक,ते श्रीनाथ चौक, ते भिगवण पुलावर विसर्जन करण्यात आले.