June 30, 2025 7:30 am

दुचाकीच्या धडकेत साडे चार वर्षाची बालिका गंभीर जखमी

अपनी भाषा में पढ़े! Translate

दुचाकीच्या धडकेत साडे चार वर्षाची बालिका गंभीर जखमी

बारामती (प्रतिनिधी – वर्षा चव्हाण)

भरधाव वेगाने चाललेल्या दुचाकीने साडे चार वर्षांच्या मुलीस धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली असून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना बारामती तालुक्यातील खांडज येथील विठ्ठलवाडी येथे ( दि.१४) रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे.
संग्राम संतोष खलाटे रा.शिरष्णे ता.बारामती जि.पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून शकुंतला प्रल्हाद गिरीगोसावी रा.विठ्ठलवाडी,खांडज ता.बारामती यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांची नात कृष्णाली अक्षय गिरीगोसावी (वय ४.५ वर्ष) रहात्या घरासमोर पायी चालत रस्ता ओलांडून घरी येत असताना ओला कंपनीची स्कुटर क्र.(एम.एच.४२ बि.एच.९८५३) सांगवी – खांडज रोडने भरधाव वेगाने,वाहतुकीचे नियम न पाळता चालक आरोपी संग्राम खलाटे याने ठोस देऊन फरफडत नेले . या अपघाताचा तपास सहायक फौजदार संजय मोहिते हे करीत आहेत.
दरम्यान अपघात झाल्यानंतर चालक दुचाकी जागेवर सोडून पळून गेला होता.त्याने थोडीशी हि माणुसकी दाखवली नाही.तर जखमी कृष्णाली हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे नातेवाईक यांनी माहिती दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!