June 29, 2025 7:19 pm

जय हरि विठ्ठलाचा नामघोष करत भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जय हरि विठ्ठलाचा नामघोष करत भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना…

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत वारकऱ्यांसाठी मोफत रेल्वेची सुविधा

अमळनेर : विक्की जाधव 

जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी काल मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येऊन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी  पंढरपूरला रवाना झाले. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांच्याकडे सदर गाडीची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शिफारस केली असुन, कोरोना कालावधी वगळता सन 2014 पासून सदर रेल्वे दरवर्षी सोडण्यात येत आहे. त्यानुसार आज भुसावळ रेल्वे स्टेशन येथून दि.16 रोजी दु.01.30 वा पंढरपूर साठी निघणाऱ्या गाडीस आज रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली.

 

सदर “विशेष आषाढी रेल्वे” गाडी उद्या दि.17 रोजी सकाळी 3.30 वा. पंढरपूर येथे पोहोचणार तर उद्याच रात्री 10.30 वा पंढरपूर येथून परतीला निघणार असुन, दि.18 रोजी भुसावळ येथे परत येणार आहे.

 

सदर अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून, सदर सुविधा वारकऱ्यांसाठी मोफत असणार आहे, यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!