सामाजिक बांधिलकी जपत जयंत पवार यांनी साजरा केला अनोखा वाढदिवस डे.
प्रतिनिधी -विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड –
संस्कार प्रायमरी आणि हायस्कूलचे अध्यक्ष आणि दौंड तालुका इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन, दौंड तालुक्याचे खजिनदार जयंत पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला. या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये सकाळी ०९ ते १०:३० वाजता संस्कार स्कूलमधील इयत्ता १ली ते १० वी.च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले. तसेच सकाळी ०९ ते १०:३० या वेळेत स्व. सुभाष अण्णा कुल ‘मतिमंद मुलांची शाळा’ पासलकर वस्ती, दौंड येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत चंद्रभागा नगर व परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर सकाळी ११:३० ते १२:०० या वेळेत राजधानी हॉटेल समोर ‘नवीन बस स्टॉप’ ‘बस थांबा’ फलकाचे अनावरण पालकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. दुपारी दौंड दुपारी ०२:०० ते ०२:३० या वेळेत ‘दौंड पाटस रोड, दौंड. या ठिकाणी ‘माझी वसुंधरा अभियान ५.० स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यानंतर संध्याकाळी ०७:०० वा. संस्कार स्कूल चंद्रभागा नगर दौंड या ठिकाणी मोठ्या उत्साहात ‘अभिष्टचिंतनाचा सोहळा’ साजरा करण्यात आला. व त्याचवेळी स्कूलमध्ये घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षक व पालक यांनी उपस्थित राहून जयंत पवार सरांना वाढदिवसानिमित्त लक्षावधी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी प्रमुख उपस्थित स्वप्निल शहा दौंड शहर अध्यक्ष भाजपा ,अमोल जगताप उपजिल्हाप्रमुख युवासेना,प्रसिद्ध शिवव्याख्याते राहूल शिंदे,प्रताप खानविलकर, प्रल्हाद जाधव ,योगेश ङाबी,रविंद्र बंड ,ओंकार कड्डे,प्रथमेश कदम, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संतोष वाखारकर व प्रोफेसर दिनेश पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता मोलाचे सहकारी निलेश खंडागळे, संतोष वाखारकर,अक्षय खांडेकर, अस्लम तडवी या सर्वांचे मोलाचा सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.