साक्री । साक्री तालुक्यातील दहिवेल येथे दि.१० जुलै रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास राजकीय वैमनस्यातून कट रचुन ६ हल्लेखोरांनी सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कन्ह्यालाल माळी गंभीर जखमी झाले आहेत
कन्हैयालाल माळी यांचे वय ४१ असून ते दुचाकी एमएच १८ बीवाय ९७४९ वरून आई-वडिलांना भेटुन राहत्या घरी येत होते. रस्त्यालगत असलेल्या विटाभट्टीजवळ मोटार सायकलवर आलेले ६ हल्लेखोरांनी शस्रसाठ्याने मारहाण केली. हे अट्टल गुंड असून ते सुपारी घेऊन असे मोठ मोठी कामे करत असल्याने त्यांना पोलीस यंत्रना घाबरते की काय अशी चर्चा धुळे जिल्ह्यातून होत आहे.
कन्हैयालाल माळी त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस प्रशासनाने परिसरातील दादागिरी, गुंडगिरी मोडीत काढावी आणि हल्ला प्रकरणातील अज्ञात संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या पाहिजे आणि खाकी वर्दी दाखवून त्याची इतर चौकशी करावी अशी दहिवेल येथील ग्रामस्थांकडून व जखमीच्या परिवारातून मागणी होत आहे. याचा शोध लावून या गुडांना कडक शिक्षा झाली नाही तर डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यकडून पोलिसांविरुद्ध व तेथील आमदार, खासदार यांच्या विरूध्द मोर्चा काढून यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.