June 30, 2025 1:23 am

पावसातली सभा अजित पवारांना विधानसभेला तारणार का…?

अपनी भाषा में पढ़े! Translate

पावसातली सभा अजित पवारांना विधानसभेला तारणार का…?

बारामती ( सह-संपादक- संदिप आढाव)
.
आज बारामती येथे राष्ट्रवादी चा जनसन्मान मेळावा संपन्न झाला. यावेळी वरूण राजाने हजेरी लावली होती. यावेळी पडणाऱ्या पावसाचा माहोल पाहून अजित पवार हे भर पावसात भाषणासाठी उभे राहिले. हे पावसातील भाषण चालू असताना राज्याच्या मंत्री मंडळातील राष्ट्रवादी चे सर्व मंत्री अजित पवारांसोबत भर पावसात उभे राहिले.
अजित पवार यांनी देखील जोरदार भाषण केले. काही वर्षांपूर्वी खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभेत असेच पावसात भाषण केल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. या सभेने जनमाणसात परिवर्तन होऊन उदयन राजेंचा पराभव झाला होता. मग हाच पाऊस विधानसभेला अजित पवार मुख्यमंत्री करण्यासाठी तारणार का? याची चर्चा जणसामान्या मध्ये होती….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!