June 29, 2025 7:26 pm

चैन ओढून अर्धातास थांबावली रेल्वे तर सामाज कंटकांनी रेल्वेवर केली दगडफेक

अपनी भाषा में पढ़े! Translate

चैन ओढून अर्धातास थांबावली रेल्वे तर सामाज कंटकांनी रेल्वेवर केली दगडफेक

अमळनेर : विक्की जाधव

चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबवून तिच्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक
केल्याची घटना दि. १२ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भोरटेक तें अमळनेर पश्चिम रेल्वेच्या यां रेल्वेच्या रूट वर घडली. यां संदर्भात अधिक माहिती अशी कीं अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रांग लागली होती. भुसावळहून नंदुरबारला जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी सुटली. रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले. काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली. हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले आणि काही समाज कंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली. दगडफेक होताच अनेक प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडीत दगड येताच काही महिला आकांताने खिडकीत बसलेल्या प्रवाशांना खिडकी लावा म्हणून ओरडत  होत्या रेल्वे गार्डने आरपीएफ कर्मचाऱ्यांना वारंवार साखळी ओढल्याच्या घटनेचे वृत्त कळवले. मात्र, दगडफेक झाल्याची माहिती नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार यांनी सांगितले तर पॅसेंजर मधील कोणीही प्रवाशी तक्रार दाखल करण्यासाठी आला नसून याबाबत गुन्हा दाखल करता आला नाही. २० मिनिटे गाडी थांबवली. ताप्ती गंगा एक्स्प्रेसला तसेच भुसावळ सुरत पॅसेंजरला चेन
पुलिंग करून थांबवले तर यां घटनेची सखल चौकशी करू असे प्रमोद ठाकूर, वाणिज्य अभियंता, रेल्वे यांनी कळवले.

https://x.com/manojchitte8/status/1811986848459129230

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!