June 30, 2025 1:17 am

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही ,अवैद्य धंदे व गुन्हेगारी थांबवणार – उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप.

अपनी भाषा में पढ़े! Translate

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही ,अवैद्य धंदे व गुन्हेगारी थांबवणार – उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड उपविभागीय पोलीस कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन हद्दीमधील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडून काढणार असल्याची माहिती नवनिर्वाचित दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली, त्यांची दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याने भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर ,संघाचे सचिव सुरेश बागल मार्मिक समाचार चे प्रतिनिधी विकी ओहोळ यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप मुलाखत घेत असताना त्यांची कारकीर्द व माहितीत म्हणाले की, उपविभागामध्ये येणाऱ्या दौंड पोलीस स्टेशन, यवत पोलीस स्टेशन, उरुळी कांचन पोलीस स्टेशन, यामधील प्रमुख समस्या म्हणजे वाहतुकीचा प्रश्न, रोड अपघात, तसेच महिला व मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे, उपविभागामध्ये अवैध धंदे करणारे व गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासणारे यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले, अवैध धंदे व चुकीच्या पद्धतीने चाललेले धंदे याबद्दल कोणी माहिती दिल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करू, माहिती देणाऱ्याचे नावे गुपित ठेवले जाईल, यापूर्वी अण्णासाहेब घोलप हे १९९३ मध्ये पोलीस खात्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले, या काळामध्ये यवतमाळ, अमरावती, नांदेड, पुणे ग्रामीण, सातारा, सोलापूर, परभणी, सासवड, बारामती, राजगड आधी ठिकाणी उल्लेखनीय काम केले, २०११ मध्ये त्यांना पोलीस निरीक्षक या पदावर बढती मिळाली, या काळामध्ये त्यांनी सातारा, सोलापूर पुणे, आदी ठिकाणी काम केले, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून यापूर्वी त्यांनी सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेमध्ये चांगल्या प्रकारे काम केले, आता त्यांची दौंड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नुकतीच नेमणूक झालेले आहे, ते दौंड तालुक्यामध्ये उल्लेखनीय असे काम करतील अशी आशा बाळगुया.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!