माळेगांव पोलिसांची दबंग कारवाई गावठी पिस्टल सह एक जण ताब्यात
बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)
.
गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून अवघ्या आठ दिवसांत पदभार स्वीकारल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम यांनी दमदार कामगिरी केली आहे.
योगेश ऊर्फ आबा बापुराव तावरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून गुप्त माहिती नुसार उपनिरीक्षक देविदास साळवे, कॉन्स्टेबल विजय वाघमोडे, राहुल पांढरे, नंदकुमार गव्हाणे, जयसिंग कचरे, ज्ञानेश्वर मोरे यांनी माळेगांव – क-हावागज कॅनल कडेला आरोपीला ताब्यात घेतले आहे.
त्याच्या कडून २५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व ३०० रुपयांचा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आला आहे.तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.