झामी चौक डीपी परिसरात ऐकास बेदम मारहाण पोलिसांत गुन्हा दखल.
अमळनेर : विक्की जाधव
झामी चौक येथे रस्त्यात एकाची मोटरसायकल अडवून त्याला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच फायटर ने मारून जखमी करून सोन्याची चैन आणि रोख रक्कम काढून घेतल्याची घटना उशिरा रात्रीघडली या संधर्भात अधिक माहिती अशी कीं
मनोज ठाकरे हा १ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास झामी चोक येथे इनो ची पुडी घ्यायला गेला असता रात्री ११: ४५ तो परत कसाली डीपी कडून येत असताना त्यांना वसीम खान, कमील उर्फ कालु रिक्षावाला, बाबा शहा, तन्वीर शहा, एजाज पठाण, असलम पठाण उर्फ अय्या आणि १५ ते २० लोकांनी अडवून त्याला शिवीगाळ करणे सुरू केले आणि जबरी जखमी केले त्यात तो खाली पाडला तसेच एकाने फायटर नाकावर मारून दुखापत केली व इतरांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तर काहींनी दगडाचा धापा त्याचा डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या गळ्यातील १० ग्राम सोन्याची चेन व खिश्यातील ५ हजार ६०० रुपये काढून घेण्यात आले. मनोज ने मार वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. तेव्हाच मनोज ची मोटरसायकलचे सीट फाडून गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनोज ने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत चोरी, जबरी लूट, आणि दंगलीचा. गुन्हा दखल केला आहे. पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत अल्ताफ, बाबा शहा, वसीम या तिघांना अटक करण्यात आली असुन. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत
पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन अमळनेरात नेहमी घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजाची बैठक घेऊन समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या