मोरपं कंपनीच्या जिल्हाध्यक्षपदी कुंडलिक धुमाळ यांची निवड
इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे. .
मोरपं ही एक राज्यामध्ये सेंद्रिय शेतीवर काम करणारे ऍग्रो प्रोडूसर कंपनी असून या कंपनीच्या अध्यक्ष अंकुश पडवळे मंगळवेढा उपाध्यक्ष स्वातीताई शिंगाडे सचिव प्रल्हाद काका वरी तज्ञ संचालक योगेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे शेतकऱ्याला येणाऱ्या अडी अडचणी साठी राज्यस्तरावर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी काम करते पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 22 तारखेला शिवाजीनगर एग्रीकल्चर कॉलेज वरती डॉ शेरामना सभागृहामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली दरवर्षी मार्चमध्ये होणारे मीटिंग निवडणुकीमुळे झाली नव्हती ती मिटींग 22 जून रोजी घेण्यात आली महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी उपस्थित होते प्रत्यक्ष शेतकऱ्याचा म्हणणं ऐकून घेऊन साहेबांनी त्यावरती समाधानकारक उत्तर दिले तसेच येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्याच्या कृषिमंत्री बरोबर मीटिंग घेतली जाईल असेही सांगितलं सेंद्रिय मालाचा मार्केटिंग बरोबरच शेतीचे गुणवत्ता याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असं साहेबांनी सांगितलं या कंपनीचा एक ऑफिस दुबईमध्येही आहे आणि शेतकरी आपला शेतीमाल एक्सपोर्ट करतात यावेळी कंपनीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी उपस्थित होते.