लक्ष्मी विविध कार्यकारी सोसायटी कुंभारगाव चे चेअरमन पदी ज्ञानदेव बंडगर यांची निवड
इंदापूर प्रतिनिधी. भगवान लोंढे. कुंभारगाव येथील लक्ष्मी विकास सोसायटी चे चेअरमन काशिनाथ धुमाळ. यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावरती ज्ञानदेव बंडगर यांची एकमताने निवड करण्यात आली .निवडणूक प्रक्रिया इंदापूर येथील ए आर . ऑफिसमध्ये पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून मिलिंद राऊत. साहेब यांनी कामकाज पाहिले .ज्ञानदेव बंडगर .यांचा एकमेव अर्ज आला होता .संतोष धुमाळ यांनी सूचना मांडली. त्याला प्रमोद धुमाळ. यांनी अनुमोदन दिले .विरोधी चार संचालक गैरहजर राहिल्यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी संचालक काशिनाथ धुमाळ, संतोष धुमाळ ,प्रमोद धुमाळ, राजेश शिंदे ,बुद्धिवान गोरे, सुरेश धुमाळ महिला संचालिका कावेरी धुमाळ, उपस्थित होते कुंडलिक धुमाळ यांनी नवनिर्वाचित चेअरमन ज्ञानदेव धुमाळ .यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नामदेव पवार ,पांडुरंग बंडगर, अनिल गोरे, संस्थेचे सचिव महादेव पवार ,सहसचिव रवींद्र धुमाळ, उपस्थित होते .नामदेव पवार .यांनी सर्वांचे आभार मानले.