शहरातील मुंदडा नगर भागात महिलेचा विनयभंग दोघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल..
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील मुंदडा नगर परिसरात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून मनीषा ( नाव बदललेले ) तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करत त्याचं परिसरात राहणाऱ्या प्रभाकर भाईदास पवार आणि भाग्यश्री प्रभाकर पवार या दोघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण मारहाण करून सदर महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात दि. २७ जून रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिकारी माहिती अशी की मुंदडा नगर भागात ३५ वर्षीय महिला ही कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार दि. २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात महिलेसह तिच्या पतीला त्यांच्या परिसरात राहणारे प्रभाकर भाईदास पवार आणि भाग्यश्री प्रभाकर पवार या दोघांनी अश्लील शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. सदर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन प्रभाकर भाईदास पवार आणि भाग्यश्री प्रभाकर पवार या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास प्रमोद पाटील करीत आहे.