June 29, 2025 12:28 pm

राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा अवमान सहन केला जाणार नाही ;सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने भिगवन येथे पुणे सोलापूर महामार्ग रस्ता रोको

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा अवमान सहन केला जाणार नाही ;सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने भिगवन येथे पुणे सोलापूर महामार्ग रस्ता रोको

(निलेश गायकवाड )

पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. हे सांस्कृतिक राजधानी असलेले शहर देखील काही असुसंस्कृत घटनांना आणि घटकांना अपवाद नाही. देशाची एकता आणि एकात्मता यांना जोडणारे काही राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा महाराष्ट्रात सतत चालू असणारा अवमान पुण्यातील हडपसर येथील घटनेने अधोरेखित केला आहे.

सामाजिक बंधुतेला काळिमा फासणारी “छत्रपती शिवाजी महाराजांचा” अपमान करणारी घटना हिंदू समाज सहन करू शकत नाही. हिंदूंची अस्मिता असणारे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अपमान झाला आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. सतत एक ठराविक समाज उरवून, कट रचून, पूर्वतायरीने फक्त हिंदू प्रतिकांची आणि राष्ट्रपुरुषांची व प्रतिकांची अपमान पुण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात चालू संघटनेच्या वतीने अधोरेखित केले आहे.

पुण्यात घडलेला घटनेला केंद्रस्थानी ठेवून यासारख्या घटना ज्या राज्यभरात घडत आहेत त्यांच्या निषेधार्थ दिनांक २८ जून २०२४ रोजी रास्ता रोको आंदोलन भिगवण येथे पार पडले. पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रस्ता रोको करण्यात आला.

आंदोलनाचा हेतू हा राज्यसरकारचे लक्ष या घडणाऱ्या घटनांकडे वेधून “राष्ट्रपुरुष व राष्ट्रप्रतिके यांचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना १० वर्षे कारावासाची शिक्षा देणारा कायदा” पारित करण्याची आवश्यकता दाखवणे हा असल्याचे संघटनेच्या वतीने सांगितले. रस्ता रोको करत घटनेचा जाहिर निषेध वेक्त केला . यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!