छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
पतंजली समिती आणि भारत स्वाभिमान न्यास यांच्या वतीने साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिवस.
योगशिक्षक .श्री गजानन माळी सर तालुका प्रभारी सौ रत्ना भदाणे , योगशिक्षिका सौ कामिनी पवार, आरती पाटील , सविता पाटील, प्रतिमा पाटील शैलजा शिंदे तसेच कर्मठ कार्यकर्ता यावेळी उपस्थित होते. प्रोटोकॉल नुसार प्राणायाम योगासने यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पतंजली महिला समिती च्या वतीने तालुका प्रभारी रत्ना भदाने यांनी आभार प्रदर्शन केले.तालुक्याच्या आदरणीय व्यक्तिमत्व नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी शिबिरासाठी मदत केली आणि गौरीसूत प्रतिष्ठानचे श्री संदिप घोरपडे सर यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे आणि जमलेल्या साधकांचे पतंजलीच्या महिला समितीच्या वतीने आभार मानले. वरील सर्वांच्या मदतीने योग दिनाचा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने पार पडला असे तालुका प्रभारी सौ रत्ना भदाणे यांनी सांगितले.