जागतिक योग दिन साजरा;स्व. शंकराराव नारायण सोट बहुउद्देशीय संस्था व महा एन जी ओ फेडरेशन व भाजप सेवा प्रकोष्ठा यांच्या वतीने

अपनी भाषा में पढ़े! Translate

जागतिक योग दिन साजरा;स्व. शंकराराव नारायण सोट बहुउद्देशीय संस्था व महा एन जी ओ फेडरेशन व भाजप सेवा प्रकोष्ठा यांच्या वतीने

(निलेश गायकवाड )

महा एन जी ओ फेडरेशन व भाजप सेवा प्रकोष्ठ तथा ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने मदनवाडी ( भिगवण ) ता.इंदापुर जि.पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त मा. शेखरभाऊ मुंदडा, संस्थापक महा एन जी ओ फेडरेशन तथा प्रदेश संयोजक सामाजिक संस्था भाजप यांचे संकल्पनेतून योग यज्ञ पुणे करिअर अकॅडमी व भैरवनाथ विद्यालय भिगवण येथे आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी योग शिक्षिका कु.प्रतिक्षा वेताळ व कु.निकिता झेंडे यांनी मार्गदर्शन केले आहे. यावेळी पुणे करिअर अकॅडमी चे राजकुमार शेंडगे सर, प्राजक्ता झेंडे, वृषाली काळे, सुकन्या कदम व भैरवनाथ विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.सोनवणे मॅडम व सहकारी शिक्षक देवकाते सर, धायगुडे सर,टेंबरे सर व सहशिक्षिका उपस्थित होते.या वेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेचे सचिव धिरज सोट पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!