June 29, 2025 10:53 am

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आकाश कदम याने ऑल इंडिया रँक ७६ मिळवून मारली बाजी

अपनी भाषा में पढ़े! Translate

परीट समाजातील आकाशने घातली आकाशाला गवसणी; UPSC परीक्षेत यश !
आकाश कदम याने ऑल इंडिया रँक ७६ मिळवून मारली बाजी

भुईंज ( प्रतिनिधी ) – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा (IFS) निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी आकाश कदम याने ऑल इंडिया रैंक ७६ मिळवून बाजी मारली आहे.

सातारा तालुक्यातील वेळे कामथी गावचा सुपुत्र आकाश हा कोल्हापूर येथील विद्या प्रबोधिनीतर्फे देण्यात येणाऱ्या चंद्रकांत पाटील स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीचा विद्यार्थी असून युपीएससीने घेतलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. भारतीय वन सेवा ही आयएएस व आयपीएससारखी ऑल इंडिया सर्व्हिस असून, भारतातील वन संरक्षण आणि संवर्धन, वन कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची सेवा मानली जाते.

वेळे कामथी ता. जि. सातारा येथील परीट समाजातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अशोक कदम व प्रा. आ. केंद्र लिंब येथे आरोग्य सेविका पदावर कार्यरत असलेल्या सौ. सुषमा कदम यांचा सुपुत्र आकाश कदम याने अतिशय अवघड असणाऱ्या (UPSC) संघ लोकसेवा आयोग २०२३ च्या IFS इंडियन फॉरेस्ट ऑफीसर या पदाला पहिल्याच प्रयत्नात आकाशने आकाशाला गवसणी घातली आहे.

कष्ट, जिद्द, ध्येय व चिकाटीच्या जोरावर आकाश सुपर क्लास वन अधिकारी झाला याचा सार्थ अभिमान कदम कुटुंबाला आहे. नगर विकास मंत्रालयात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेली आकाशची मोठी बहीण कु. कावेरी हिची मिळालेली मोलाची साथ व ध्येय गाठण्यासाठी दिलेली हाक ख-या अर्थाने सार्थ झालीय.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!