अमळनेर न्यायालयाच्या आवारात जावायानेचं केला सासूचा विनयभंग..
अमळनेर : विक्की जाधव
न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर येणाऱ्या सासूला जावयाकडून मारहाण झाल्याची घटना घडली असून अमळनेर पोलिसात विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहाळ तां. चाळीसगाव येथील मीराबाई राजेंद्र कुटुंबळे यांची मुलगी माधुरी हिचे लग्न अमळनेर येथील पिंपळे रोड क्रांती नगर येथील चंदन भोळे यांच्याशी २०११ मध्ये झाले. मात्र कौटुंबात सतात सुरु असणाऱ्या वादामुळे मागील दोन वर्षांपासून मुलगी माधुरी माहेरी राहत आहे. १८ रोजी मीराबाई कुटुंबळे या त्यांचे पती राजेंद्र कुटुंबळे हे अमळनेर न्यायालयात असलेल्या गुन्ह्याबाबतीत अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात आले होते. दुपारी ३ वाजता त्याचे अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केल्याने ते न्यायालया बाहेर जातं असतांना त्यांचे जावई चंदन भोळे तिथे आले. आमच्या विरोधात असलेली केस मागे घ्या असे चंदन भोळे याने सासूला सांगितले. यावेळी चंदन भोळे यांनी मारहाण करायला सुरुवात केली असुन अमळनेर पोलीस स्टेशन ला विनयभंगा चा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस करित आहेत.