June 29, 2025 4:37 am

आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पदरात मतदानाच्या स्वरूपात भरभरून दान टाकणाऱ्या माळेगाव खुर्दच्या स्वाभिमानी आणि निष्ठावंत मतदारांचे जाहीर आभार..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पदरात मतदानाच्या स्वरूपात भरभरून दान टाकणाऱ्या माळेगाव खुर्दच्या स्वाभिमानी आणि निष्ठावंत मतदारांचे जाहीर आभार..!
– अजिंक्य गायकवाड, माळेगाव खुर्द, ता. बारामती…
.
बारामती (सह संपादक-संदिप आढाव)
.
आदरणीय ताईंनी बारामती लोकसभा मतदार संघात कण्हेरीच्या मारुतीरायाला नारळ फोडून प्रचाराचा झंजावत सुरू केला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव संपूर्ण लोकसभा मतदार संघात ग्रामीण भागात फक्त माळेगाव खुर्दच्या नवसाला पावणाऱ्या श्री यमाई देवीला प्रचाराचा नारळ फोडला होता आणि खऱ्या अर्थानं तिथेच ताईंच्या विजयाची खात्री पटली होती कारण फक्त प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आहे असं ताईंना सांगितल होत पण लोकांची गर्दी आणि उत्साह बघता तिथं सभा झाली आणि त्याच माळेगाव खुर्द करांनी आज ताईंच्या पदरात भरभरून दान टाकल जवळपास विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पडलेल्या मतांच्या आकड्यांन पेक्षा सुप्रिया ताईंच्या लीडचा आकडा हा जास्त आहे..!

आमदार रोहित दादांच्या सभेला रात्री १२ वाजता थांबलेला प्रंचड जनसमुदाय हिच आपली ताकत होती कारण प्रत्येक जण जीव ओतून काम करत होता याने आपल्या गावच चित्र बरच स्पष्ट केलं होत तसेच आदरणीय राजेंद्र दादांनी गावात दिलेला वेळ आणि त्यामुळे झालेलं मतांचं परिवर्तन आपल्याला बळ देऊन गेलं कारण आदरणीय दादांची शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ हिच आपल्या कामी आली एकीकडे मलिदा गँग दिग्गज लोक हजारों लोकांची जेवणावळ आणि आपल्याकडे उपाशी तापाशी असणारी आपले सगळे कार्यकर्ते याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे कधी राजकारणात मतदार यादी माहीत नसलेली पोरं सुधा मतदाना दिवशी सकाळी ६:०० पासून मतदार यादी चाळून लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करत होते याचं फळ आपल्याला विजयाच्या रूपाने निश्चित मिळालं यामध्ये गावातील ज्येष्ठ लोकांनी साथ दिली नोकरी निमित्त बाहेर असणाऱ्या लोकांनी साथ दिली म्हणूनच हे यश आपल्या सर्वांचं आहे आज पर्यंतच्या इतिहासात संपूर्ण गावाला वेडा मारणारी विजयी रॅली कधीच निघाली न्हवती ती काल पहिल्यांदा निघाली कारण हा विजय प्रत्येक घरातून झालेल्या मतदानाचा होता..!

खरंतर आपण सर्वांनी एकमताने आणि एकदिलाने काम केलं आपल्या सोबत काम करणाऱ्या काही लोकांवर दबाव टाकण्याचा वारंवार प्रयत्न केला गेला, ज्या लोकांवर दबाव टाकला त्याचं लोकांनी मागील कित्येक इलेक्शन सोबत राहून पुढारपण म्हणून मिरवायला संधी दिली होती.. त्याच लोकांना त्रास दिला गेला, कारण माणूस एकदा दुखावला की तो परत कधीच तुमच्या पक्तीला येऊन बसत नाही..कारण स्वतःची पत पणाला लागली की लोकं कोणत्याही थराला जातात मग परके आपलेसे वाटू लागतात आणि आपले परके वाटू लागतात…!

खरंतर राजकारण हे माणसांनी नक्की करावं पण राजकारण करत असताना ज्या लोकांनी कधी काळी कसलीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला साथ दिली होती त्या लोकांना दुखवून राजकरण कधी करू नये, कारण हे असल राजकारण आपल स्वतःच अस्तित्व धोक्यात आणत. आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला राजकारणाची व्याख्या खूप चांगली सांगितली आहे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही पवार साहेबांची राजकारणाची व्याख्या आणि म्हणून राजकारण करत असताना आपण समाजासाठी काय योगदान दिलं, किती गोर गरिबांना मदत केली, किती लोकांच्या सुख दुःखात न बोलवता सहभागी झालो, किती लोकांच्या अडी अडचणीच्या काळात आर्थिक स्वरूपात किंवा अजून शासकीय प्रशासकीय मदत केल्या, किती लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला, या वर राजकारणाची समीकरण ठरत असतात आणि हेच उपकार लोक मनात ठेवतात आणि एक ना एक दिवस ते दाखवून देतात आणि याची प्रचिती ही लोकसभा निकालाच्या माध्यमातून आली बाकी कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही आम्हाला राजकारणा पेक्षा समाजकारण प्रिय आहे आणि लोकांच्या सुखा मध्ये मान सन्मानाने मिरवण्यापेक्षा दुःखात न बोलवता सर्वात प्रथम हजर राहायला आपली बांधलेली ही महाविकास आघाडीची मोट तयार असावी एवढीच आपल्या सर्वांन कडून अपेक्षा..!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!