June 29, 2025 12:02 am

सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळा आणि साई इंग्लिश अकॅडमि यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळा आणि साई इंग्लिश अकॅडमि यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा..

 

अमळनेर : विक्की जाधव.

सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळा आणि साई इंग्लिश अकॅडमि यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा..5 जून रोजी-जागतिक पर्यावरण दिन सोहळा साजरा करण्यात आला.सोहळ्यास बळवंत विठ्ठल पाटील-वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखली महाराष्ट्र शासन वन विभाग टीमची उपस्थिती लाभली. आय.टी.चव्हाण- वनपाल , पी.जे.सोनवणे-वनपाल,वैशाली साळी मॅडम-वनपाल सामाजिक वनीकरण,अमळनेर तसेच सीमा शिंदे मॅडम-वनरक्षक , सुप्रिया देवरे मॅडम वनरक्षक उपस्थित होते. प्रमुख अतिथी आय.टी. चव्हाण व सीमा शिंदे मॅडम, यांनी आपल्या  मनोगत भाषणात म्हटले -पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्या जगभरात जाणवत आहेत.त्यासंदर्भात जनमानसांत जागरूकता निर्माण व्हावी,यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व आपल्याला समजले, वृक्ष हेच ऑक्सिजन-प्राणवायूचे प्रमुख स्त्रोत आहेत…म्हणूनच जास्तीत जास्त वृक्ष आपण लावली पाहिजेत,ती जगवली पाहिजे.ह्या प्रसंगी विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली.विद्यार्थ्यांनीसुद्धा मनोगतात सांगितले-आम्हाला मिळालेली रोपे आम्ही आजच आमच्या घराच्या बागेत, परिसरात,शेतात व इतरत्र लावू.रोपांची काळजी घेऊन,संगोपन करून रोपांचा वाढदिवस साजरा करू. या सोहळ्याचे प्रास्ताविक भैय्यासाहेब  मगर यांनी केले.सूत्रसंचालन व आभार कु.प्रियंका बारी यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!