गुजरात महिला हौसिंग ट्रस्ट ने शहराच्या विविध भागात केले 200 वृक्षाची लागवड
अमळनेर : विक्की जाधव.
गुजरात महिला हौसिंग ट्रस्ट च्या ५ जुन २०२४ पर्यावरण दिनानिमित अमलनेर शहरातील विविध भागाला 11 ठिकाणी ( ताड़ेपुरा, मांगवाडा, भिलाटी, मुल्लाटेक,गांधलीपुरा ,रुबजिनगर, मिलचाल स्टेशन, मिलचाल धर्म्रशाला,मिलचाल गलवाडे,बंगाली फ़ाईल, कुंभारटेक, झोपडपट्टी भागात 200 वृक्षारोपण केले.
महिला हाउसिंग ट्रस्ट हे अमलनेर शहराचा ‘ग्रीन आणि ब्लू’ प्लान तयार केलेले असून त्यावर काम करत आहे. यासाठी शहरातील झोपडपट्टी भागातील महिलाना सक्षम करुन तेथील स्थानिक महिलांचा हाताने ज्या –त्या भागात त्यांचा सहभाग घेवुन वृक्षारोपण करण्यात आले. त्यात विकासिनी ,वॉटर मँनेजर व पर्यावरण सखी यानी देखिल प्रामुख्याने वृक्षासाठी खड्डे करणे, काळी माती आणणे पाण्याची सोय करणे या स्वरूपात सहभाग नोंदवला.
यात वृक्षारोपण करण्यासाठी त्यांनी नीम,करंज,सीसम,आवळा,सिताफळ अश्या विविध जातीचे वृक्ष शहरातील 11 भागात लावण्यात आले. त्या वृक्षांची देखरेख व काळजी घेण्याची जबाबदारी त्या भागातल्या महिलांनी स्वतः घेतली.