नागाव येथे विषारी औषधी द्रव्य प्राशन करून एकाने संपवले जीवन.
अमळनेर : विषारी औषधी द्रव्य प्राशन करून एकाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले असुन सदर घटना तालुक्यातील नगाव येथे घडली आहे.
या संदर्भात अधिकारीक माहिती अशी की, नगाव बु. येथील अरुण हरी पाटील (वय ५५) यांनी दि. २३ मे रोजी सकाळी सहा वाजेच्या घराशेजारी असणाऱ्या खळ्यात शेती उपयोगी विषारी औषधी द्रव्य प्राशण केल्याचे सांगितले तेव्हाच त्याला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी धुळे येथें पुढील उपचारासाठी हिरे वैद्यकीय
महाविद्यालय दाखल करण्यास सांगितले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून सुकलाल हरी पाटील यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.