नागरिकांनो सावधान वाढत्या तापमानात घ्या स्वतः ची काळजी मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशाच्या घरात..
अमळनेर : विक्की जाधव..
राज्यात विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट वातावरण असून नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या विशेष तापमान बुलेटीननुसार, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची काल नोंद झाली.
दरम्यान, नाशिक, जळगाव तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० पार गेल्याचे दिसून आले. काल नाशिक, मुंबई, धुळे भागात लोकसभा निवडणूकीचे मतदान असल्याने भर उन्हात नागरिकांना थांबावे लागले.
पुढील दोन दिवसात…
हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून २ ते ३ अंशांनी तापमान वाढून पुन्हा तापमान घसरण्याचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी भर उन्हात बाहेर जाणे टाळावे तसेच भरपूर पाणी पित राहण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.