सामाजिक कार्यकर्ते, निसर्ग प्रेमी श्री भुषण आसांबर चौधरी यांनी केले परिवार सह मतदान
मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.सोशलमिडिया व्दारे सर्वांनी मतदान अवश्य करा, लोकशाही बळकट करून आतंकवाद मुक्त भारताला मतदान करावे, विकसित भारताला मतदान करावे , असे आवाहन करत सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले श्री भुषण आसांबर चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.