June 30, 2025 3:29 am

धोबी समाजाचा वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न : ३१३ युवक युवतींनी दिला परिचय

अपनी भाषा में पढ़े! Translate

धोबी समाजाचा वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न : ३१३ युवक युवतींनी दिला परिचय
जळगाव जिल्हा परिट (धोबी) सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्य धोबी समाज सर्वभाषिक महासंघ जिल्हा शाखा, जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, जळगाव जिल्हा लॉड्री व्यवसायिक असोसिएशन, संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था, डी.पी.एल.धोबी समाज युवा संघटन,जळगाव शहर परदेशी धोबी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात धोबी समाज वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा धोबी समाज मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुरत महानगरपालिकेचे उप अभियंता सृष्टी महाले, नगरसेवक गणेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भोळे, अरुण राऊत,सुरेश ठाकरे, भूषण सोनवणे, शंकर निंबाळकर,अमर परदेशी, रमेश लिंगायत, भास्करराव वाघ, दिपक बाविस्कर, शाम वाघ, पूनमचंद चव्हाण नंदुरबार, राजेंद्र सोनवणे, राजेश चंदनकर अकोला, संदीप सुरडकर यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले वधू वर परिचय मेळाव्यात जळगाव, धुळे,नंदुरबार, नाशिक, मुंबई, अकोला, वर्धा, नवापूर, मध्यप्रदेश, गुजरात येथील युवक युवती यांनी परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर युवक युवती परिचय संचलन करुणा महाले, गणेश बच्छाव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप सोनवणे, विजय सोनवणे, कैलास सोनवणे, जयंत सोनवणे, प्रशांत मांडोळे, दिनकर सोनवणे, विनोद शिरसाळे, चंद्रकांत वाघ, सोपान रायपूरे, किशोर शिरसाळे, संतोष बेडीस्कर, गणेश सपके, किशोर बोरसे, जगन्नाथ बाविस्कर, पंकज महाले, मनोज वाघ,राकेश सूर्यवंशी,प्रविण आढाव, आबा केणे,सतीश वाघ यांचेसह सर्व समाज संस्था पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमास समाजातील असंख्य बंधू भगिनी यांची उपस्थिती होती याप्रसंगी जिल्ह्यातील तालुका समाज अध्यक्ष सचिव यांनी अर्ज नोंदणी साठी केलेल्या सहकार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!