प्रा.डॉ.गजानन सानप यांचा अखिल भारतीय धोबी महासंघाकडून गौरव..
अमळनेर : विक्की जाधव..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकतीच संपन्न झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाच्या सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी एकमताने विद्यापीठातील ग्रामीण समस्या संशोधन केंद्राचे नाव” राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामीण समस्या संशोधन केंद्र ”
असे करण्याचा ठराव मंजूर करून ग्राम स्वच्छता अभियानाचे जनक,मानवतेचे पुजारी,समाजाचे चालते बोलते संस्कार पीठ विज्ञानवादी संत, अंधश्रद्धेवर आघात करणारे ज्येष्ठ समाज प्रबोधनकार, निष्काम कर्मयोगी,राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांचे महाराष्ट्रातील ग्राम विकासातील कार्याचा गौरव वाढवला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील व देशभरातील परीट धोबी समाज बांधवांच्या वतीने या सर्वांचा गौरव अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय श्री. एकनाथराव बोरसे,मा.श्री. किसनराव जोर्वेकर,मा.श्री. अनिलजी शिंदे, मा.श्री.गणेशजी मढीकर प्राचार्य सदाशिवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी… समाजातील अनेक मान्यवरांसह प्रा.डॉ. पंढरीनाथ रोकडे प्रा.डॉ.प्रशांतजी नेतनकर प्रा.डॉ.बालाजी नवले यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते