November 24, 2024 5:37 pm

संधीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यालां अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

संधीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यालां अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा..

१००% यशाची हमी म्हणजे यशपंढरी इंग्लिश क्लास आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निच्चीत करा..

अमळनेर: वडील शेतात गेल्यावर अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील एकास अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, ६ जानेवारी २०२२ रोजी अल्पवयीन मुलीचे आई वडील आजोबा तूर कापण्यासाठी शेतात गेले असता गोरगावले खुर्द येथील धीरज रवींद्र फुगारे (वय २०) हा दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत घरात प्रवेश करून तिला तू मला फोन का लावत नाही म्हणून विचारणा केली. त्यानंतर त्याने त्या मुलीशी अतिप्रसंग केला. त्यात मुलगी जखमी झाली. तसेच तिला मारहाण देखील केली. सायंकाळी मुलीचे आई वडील घरी आले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलीला उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दवाखाण्यातच पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी धीरज फुगारे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केला. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता.

खटल्यात तपासले ११ साक्षीदार

सरकारी वकील अॅड. शशिकांत पाटील यांनी यात ११ साक्षीदार तपासले. पीडिता , तिची आई , डॉ. गुरुप्रसाद , डॉ. पंकज पाटील, डॉ. पवन पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून न्या. पी. आर. चौधरी यांनी आरोपी धीरज फुगारे याला भा द वि ३७६ प्रमाणे १५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!