June 29, 2025 3:55 pm

२०० वर्षाची परंपरा असलेल्या सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरचा आज रथ उत्सव

अपनी भाषा में पढ़े! Translate

२०० वर्षाची परंपरा असलेल्या सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेरच्या रथोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळीवेगळी ओळख म्हणजे मुस्लिम बांधव या रथाला पहिली मोगरी लावत असतात.

अमळनेर : विक्की जाधव..

परंपरेने चालत आलेल्या प्रत्येक गोष्टीचे काटेकोरपणे पालन होऊन वाडी संस्थानचा यात्रा उत्सव साजरी होत असतो. आज सायंकाळी ६:४५ वा. वाडी संस्थान येथून रथोत्सवास सुरुवात होईल रथामध्ये श्री लालजींची भव्य अशी प्रकट अखंड मूर्ती विराजमान असते तर रथाच्या पुढे दोन घोडे असतात पुढे गरुड आणि मारुती हे वाहन असते वर्षानुवर्षे परंपरेने चालत आलेला हा उत्सव वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी पूल पैलाड मातंग वाडा कसाली मार्गे रथ दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेला वाडी संस्थानात दाखल होत असतो.

 १००% यशाची खात्री म्हणजे यश पंढरी इंग्लिश क्लास आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा..

रात्र भर रथाच्या मागे प.पू.प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत असतात. रथोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणात संपूर्ण खानदेशातून गर्दी होत असते.

शुभारंभ प्रसंगी सर्व प्रत्येक समाज या रथोत्सवाची जबाबदारी सांभाळत असतो. रथोत्सवाचा सोहळा पार पाडण्यासाठी गावातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात येत असते ही ही परंपरा वर्षं वर्ष चालत आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!