परीट धोबी समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्याचे १९ मे रोजी जळगांव येथे आयोजन.
अमळनेर : विक्की जाधव..
समाजातील विवाहच्छुक युवक युवती यांचे विवाह जुळविण्यासाठी पालकांचा वेळ व आर्थिक खर्च वाचावा यासाठी एकाच ठिकाणी युवक युवती यांचा परिचय व्हावा या उद्दात हेतूने जळगाव जिल्हा परिट धोबी सेवा मंडळ, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर बहुद्देशीय मंडळ, महाराष्ट्र राज्य धोबी परिट समाज सर्व भाषिक महासंघ जिल्हा शाखा, जळगाव जिल्हा लॉड्री असोसिएशन, डी.पी.एल.धोबी समाज युवा संघटन, संत गाडगेबाबा युवा फौडेशन,संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, जळगाव शहर परदेशी धोबी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मे रविवार रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे धोबी समाजातील विवाहच्छुक युवक युवती साठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व समाज संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत असून समाज बांधवांचे देखील अनमोल सहकार्य लाभत आहे. या वधू वर परिचय मेळाव्यात नाव नोंदणी करून प्रत्यक्ष परिचय देणाऱ्या युवक युवतींच्या वधू वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन देखील जून महिन्यात करण्यात येणार आहे या मेळाव्यात नाव नोंदणी केलेल्या युवक युवती यांनाच सहभागी होता येईल तरी अद्यापही समाजातील ज्या विवाहच्छुक युवक युवती यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी वरील संस्था पदाधिकारी यांचेकडे लवकर लवकर नोंदणी अर्ज भरून नोंदणी करून घ्यावी व वधू वर परिचय मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने समाज बंधू भगिनी यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा परिट धोबी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुणभाऊ शिरसाळे यांनी केले आहे.