कर्मदरिद्री खासदार !
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसे खुप श्रीमंत आहेत मात्र मनाने ते कर्मदरिद्री आहेत. आश्चर्य वाटतअसेल तर मॅक्सीलाईफ या रूग्णालयात गेले ८ दिवस उपचार घेत असलेल्या श्रीमती अन्नपुर्णा शिरसाट यांना विचारा ! ही वयोवृद्ध महिला दि. २ मे रोजी या युवराजाचे नामांकन भरण्यासाठी दोन दोन शे रूपये देऊन गोळा केलेल्या गर्दी चा एक भाग होती. दोनशे रूपयांत माणसं भाड्याने घेण्याची ही वृत्तीच मानवतेला कलंक लावणारी आहे. त्यात आपल्या मातेपेक्षा दहा वर्षे मोठ्या असलेल्या वयोवृद्ध महिलेस २०० रूपयांच्या जुजबी मोबादला देऊन राबवणे या युवराजाला शोभते का ?आणि म्हणे मी विकास केला.खरोखर विकास केला असता तर अशी लोकं गोळा करण्याची वेळच आली नसती. या गर्दीत फटाक्याच्या स्फोटात ही वयोवृद्ध महिला भाजली होती.या घटनेस आज १५ दिवस होऊन गेले.त्या दलाल बाईने या महिलेस भाजल्याबरोबर उपचार करण्याऐवजी या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून घरी नेऊन सोडून दिले. आठ दिवसानंतर श्रीमती अन्नपुर्णा शिरसाट यांच्या मुलांनी व सूनेने शासकिय मध्यवर्ती रूग्णालयात दाखल केले. मी व माझ्या सहका-यांनी या प्रकरणात लक्ष घालताच हे कुंभकर्ण जागे झाले व त्यांनी मॅक्सीलाईफ या खाजगी रूग्णालयात नेऊन टाकले. मात्र गेल्या १५ दिवसांत त्यांनामदत देण्याची नियत झाली नाही.
मी स्वत: या प्रकरणी आमदार डॉ.बालाजी किणीकर व सुनील चौधरी यांच्याशी फोनवर बोलून सदर महिलेस नुकसान भरपाई म्हणून काही मदत करावी,अशी विनंती करून ५ दिवस लोटले तरी या रथी महारथींनी मदतीचा हात दिला नाही. ते मिंधे गटात असूनही मी सदर वयोवृद्ध महिलेच्या मदतीसाठी फोन केला. निवडणूक प्रचारावर कोट्यावधीची उधळण करणा-या या खासदाराची झोळी अशा वेळी फाटते का ? हे खोकेबाज आपल्याच चुकीमुळे जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेस मदत करताना भिकारी होत असतील तर त्यांनी जाहिर करावे मी एका दिवसात त्यांना मुबलक मदत मिळवून देण्याची क्षमता ठेवतो.
सुज्ञ मतदारांनी वरील घटनेपसून योग्य तो बोध घ्यावा व या कृतघ्न व असंवेदनशील लोकाच्या धनुष्यातील बाण काढून कुठे तो घालावा. अखेर स्वाभिमानी मशालच जनतेच्या सुखादु:खात कामी येते.. हे संधीसाधू जनतेला वापरून बेवारसा
प्रमाणे सोडून देतात. यांना माफ करू नका ! त्यांना त्यांची औकात दाखवा.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०