बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) महाराष्ट्राची मायमाऊली साने गुरुजींच्या कर्मभूमीत मला नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणूक संदर्भात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.असे प्रतिपादन टी.डी.एफचे राज्यकार्यकारिणी सदस्य निशांत रंधे यांनी व्यक्त केले.
नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणूक संदर्भात टिडीएफचे राज्यकार्यकारणी सदस्य निशांत रंधे नाशिक विभागातील शाळा,महाविद्यालयांना भेट देत असुन भावी शिक्षक आमदार शिक्षकच असावा म्हणून निशांत रंधे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.नुकतीच जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना रंधे यांनी भेट दिली.
यावेळेस मानवता अभ्यासपीठचे अध्यक्ष मा.आ.बी.एस.पाटील,खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डाॅ.अनिल शिंदे,एन.टी.मुंदडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा,जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील,जळगाव जिल्हा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष तथा मारवड येथील ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील,श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील,गुरुदत्त एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील,शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कैलास पाटील,अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष तुषार बोरसे,मा.अध्यक्ष प्रकाश पाटील,धनदाई माता एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील,मुडी येथील संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील,व तालुक्यातील संस्थाचालक व शाळांना सदिच्छा भेट दिली.,व शाळा,महाविद्यालयाच्या शिक्षकांशी संवाद साधला.तसेच नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील मतदारांच्या संपर्कात आहेत.
किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या शं.पा.माळी माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक व किसान विद्या.प्रसारक संस्थेत सचिव पदावर आहेत,त्यामुळे त्यांचा शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा सखोल अभ्यास आहे.निशांत रंधे गेली अनेक वर्ष टी.डी.एफच्या माध्यमातून काम करत आहेत म्हणून यावेळेस नाशिक विभागातील शिक्षक आमदार पदाची उमेदवारी करत आहेत. रंधेंनी आजपर्यंत सामान्य कार्यकर्ता म्हणून संघटनेचे कामच श्रेष्ठ मानुन,प्रत्येक निवडणुकीत मनापासून मदत केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात संपर्क,नम्र,मितभाषी स्वभाव,असल्याने शिक्षकांशी त्यांचा दांडगा संपर्क असल्याने शिक्षक मित्र म्हणून ओळखले जातात.
सध्या महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्यकार्यकारणी सदस्य,धुळे-नंदुरबार ग.स बँकेचे गटनेते,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे सिनेट सदस्य असून,यामुळे नाशिक विभागातील शिक्षकांमध्ये परिचित आहेत.
विनाअनुदानित शाळा व महाविद्यालय,दिव्यांग शाळा,जुनी पेन्शन योजना,यासाठी सक्रिय सहभाग असुन तालुका ते राज्य पातळीवरील आंदोलनात सहभाग आहे.मुंबई येथील मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा करुन आंदोलनात सक्रिय पाठिंबा आहे.विनाअनुदानित शाळांचा प्रश्न,शिक्षक भरती,
जुनी पेन्शन योजना,शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता,अशा शिक्षकांच्या मुलभूत प्रश्नांसाठी
शिक्षकांच्या मागे ठामपणे उभे आहेत.शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी नेऊन सोडविण्यासाठी त्यांची उमेदवारी असुन खान्देशात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.