घरांना आग लागल्याने लाखाचे झाले नुकसान..
अमळनेर :विक्की जाधव.
याबाबत अधिक माहिती अशी की, बापू धनगर यांच्या पत्नी सकाळी साडे दहा वाजता स्वयंपाक करत असतांना गैस पेटवताच अचानक आग लागली. त्या ओरडत घराबाहेर पडल्या. आजूबाजूचे नागरिक धावत आले मात्र तोपर्यंत
संपूर्ण घराणे पेट घेतला होता. ग्रामस्थ हातात हंडे,बादल्या घेऊन आग
विझवण्याचा प्रयत्न करीत होते मात्र आग आटोक्यात येत नव्हती. घराला
लाकडी छत असल्याने लवकर पेट घेतला होता. काही ग्रामस्थांनी
शेजारील घराना आग लागू नये म्हणून धाब्यावर जाऊन खोदण्यास
सुरुवात केली. तोपर्यंत आसाराम राजधर धनगर यांच्याही घराला आग
लागली. बाजूच्या सुनील आत्मराम गुरव यांच्याही घराला आग लागली. नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागास आगीचे वृत्त कळवताच अग्निशमन बंब करणखेडा येऊन आग आटोक्यात आणली . अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, वाहन चालक फारुख शेख, फायरमन मच्छिन्द्र चौधरी, वासिम पठाण यांनी आग विझवली. बापू धनगर व आसाराम धनगर यांच्या घरातील कपडे, फ्रीज, टीव्ही, घरगुती साहित्य सारे काही जाळून खाक झाले. घराचे धाबे
खोदल्याने त्यांना राहायला जागा देखील राहिलेली नाही. तसेच सुनील
आत्मराम गुरव यांनी त्यांचे घर स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य ठेवण्यासाठी दिले होते. त्याही घराला आग लागल्याने सर्व धान्य जळून
खाक झाले. मंडळाधिकारी सुरेश चौधरी, तलाठी संगीता भोसले यांनी नुकसानीचा पंचनामा केला. तर तर दुसऱ्या दिवशी अमळनेर काँग्रेस ने आगीत नुकसान झालेल्या कुटुंबप्रमुखांना प्रत्येकी पाच हजारची मदत देऊन दिला मदतीचा हात यावेळी काँग्रेस नेते डॉक्टर अनिल शिंदे, धनगर आण्णा, प्रताप आबा,प्रा सुभाष जिभाऊ,आसाराम धनगर, बापू धनगर, विश्वास आबा,ताराचंद नाना,प्रकाश मनोरे,लक्षुमन दादा,रवींद्र चौधरी सरपंच अलकाताई गुलाबराव धनगर ,उपसरपंच महेंद्र भैया,सुधाकर बापू, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.