June 29, 2025 9:30 am

शिवसेनेच्या सचिव, प्रवक्त्या तथा आमदार डॉ. मनिषा कायंदे व शिवसेना महिला तालुका प्रमुख ज्योती सुरवसे यांच्या सहकार्यातून अल्पवयीन मुलीचा लागला शोध

अपनी भाषा में पढ़े! Translate

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – माळशिरस तालुक्यातील नातेपुते (फोंडशिरस) येथील एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 45 वर्षाच्या इसमाने फुस लावून पळवून नेले होते. या संदर्भात सदर अल्पवयीन मुलीच्या आई वडीलांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता फक्त मिसींगची तक्रार दाखल करून घेण्यात आली होती. मुलीचा शोध लागण्यासाठी आई वडील जीवाच्या आकांताने पोलीस प्रशासनास विनवण्या करीत होते परंतु 12 ते 13 दिवस झाले तरी शोध लागत नसल्याने मुलीच्या आई वडीलांनी माळशिरसच्या शिवसेना महिला तालुका प्रमुख ज्योती सुरवसे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सुरवसे यांनी तात्काळ शिवसेनेच्या सचिव, प्रवक्त्या तथा आमदार डॉ. मनिषा कायंदे यांच्या कानावर सर्व हकीकत सांगितली असता डॉ. कायंदे यांनी पोलीस प्रशासनाला सुचना करीत तात्काळ मुलीचा शोध घेण्याचे सुचित केले. डॉ. कायंदे यांचा दूरध्वनी येताच पोलीस प्रशासन खडबडून सजग होत एपीआय महारूद्र परजणे यांनी पोलीसांची विशेष पथके तयार केले व पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सदर पथके विविध ठिकाणी रवाना केली व दोनच दिवसांत सदर मुलीला पोलीसांनी शोधून काढले व तिला सध्या बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे. मुलीला घेवून जाणाऱ्या इसमाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणानंतर अल्पवयीन मुलीच्या आई वडीलांनी शिवसेनेच्या सचिव डॉ. मनिषा कायंदे व शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख ज्योती सुरवसे यांचे आभार मानले तसेच गोरगरीबांच्या मदतीसाठी धावून येणारी एकच संघटना ही शिवसेना असल्याचे भावनीक उद्गगार यावेळी मुलीच्या आई वडीलांनी शिवसेनेबाबत काढले. सदर घटनेनंतर शिवसेनेच्या कार्याशी प्रेरित होत सदर गावातील 50 नागरीक शिवसेनेत प्रवेश करीत असल्याची माहिती यावेळी शिवसेनेच्या तालुका प्रमुख ज्योती सुरवसे यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!