असा सामाजिक कार्यकर्ता होणे नाही..
अमळनेर : विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालयातील जेष्ठ लिपीक ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी व पालकांचे प्रताप महाविद्यालयातील कुठलेही काम असो त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ, महाविद्यालयात काम करतांना प्रचंड कामाचा ताण असूनही आलेल्या प्रत्येक माणसाच्या समस्येचे निराकरण करुण कधीही मागेपुढे न बघता नेहमी आलेल्या प्रत्येकाला सकारात्मक प्रतिसाद देऊन, योग्य मार्गदर्शन करणारा सचिन दादा आज आपल्यात नाही, असे समजतात प्रताप कॉलेज येथील काही विद्यार्थ्यांना अक्षरशा रडू आले. जूनियर कॉलेजची समस्या कोणतीही असो सर्वांच्या तोंडावर फक्त एकच नाव आहे ते म्हणजे सचिन खंडारे.. आज सचिन खंडारे आपल्या दिसणार नाहीत या शब्दावर विश्वास बसत नाही.
दुर्गा हॉस्पिटलजवळ संत गजानन महाराजांचे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी त्यांनी रात्रदिवस मित्र परिवाराला घेऊन त्या ठिकाणी एक चांगली वास्तू उभी केली त्यांचे सामाजिक धार्मिक क्षेत्रातील योगदान हे उल्लेखनीय होते… मंदिरासाठी त्यांच्या मोठमोठे संकल्पना होत्या. परिसरातील नागरिकांसाठी अहोरात्र
झटणारे, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे, सर्वांशी सौजन्याने वागणारे एक संवेदनशील व प्रेमळ व्यक्तिमत्व, असे अनेक प्रसंग आहेत कि त्यामध्ये ते अनेकांच्या सुख दुःखात खंबीरपणे उभे राहिलेले आठवतात, परंतु त्यांचीच फक्त आणि फक्त आता आठवण मनात तेवत ठेवावी लागेल असे दिलखुलास व सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व….
सामाजिक कार्याला नेहमी त्यांनी प्राधान्य दिले होते कोणताही प्रश्न असो लागलीस त्याची निरसन करणे हा त्यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण होता कधी रागवले नाही….. प्रत्येक व्यक्तीला मदत करणे हा त्यांचा स्वभाव धर्म होता….
मा.सचिनभाऊ मधुकर खंडारे यांची प्राणज्योत
मालवली खरे तर आपल्यातील एक असामान्य घरातून पुढे येऊन सर्वांच्या मदतीला धावून येणारा उमद्या व धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांस मार्मिक समाचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.